|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विराज कुराडे राज्यात प्रथम, दिप्ती दोरूगडे दुसरी

विराज कुराडे राज्यात प्रथम, दिप्ती दोरूगडे दुसरी 

शिष्यवृत्ती परीक्षेत आजरा तालुक्याचे घवघवीत यश

प्रतिनिधी/ आजरा

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तूर येथील कुमार विद्यामंदिरचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी विराज अमृत कुराडे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तर आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थीनी दिप्ती रवींद्र दोरूगडे हिने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत आजरा तालुक्याने घवघवीत यश संपादन केले आहे. सोमवारी सायंकाळी संकेतस्थळावर शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील किमान शंभर विद्यार्थी प्रत्येक वर्षी शिष्यवृत्तीधारक बनले पाहिजेत या उद्देशाने गेल्या काही वर्षात काम केले गेले. आजरा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी याची सुरूवात तालुक्यात केली. येथील शिक्षक संघटना, शिक्षक पतसंस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून शिष्यवृत्ती सराव चाचणीचा पॅटर्न सुरू केला. आजही हा पॅटर्न तालुक्यात राबविला जात आहे. यामुळेच गेल्या काही वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्याचे नाव वरच्या क्रमांकावर असून यंदा विराज व दिप्ती यांनी मिळविलेल्या यशाने तालुक्याचा लौकीक वाढला आहे.

Related posts: