|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दहिगाव येथे वृक्षारोपणातून हिरवाईचा निर्धार

दहिगाव येथे वृक्षारोपणातून हिरवाईचा निर्धार 

वार्ताहर /कोरेगांव :

दहिगाव येथील ग्रामस्थ व युवकांनी एकत्र येत वृक्षारोपणातून हिरवाईचा निर्धार केला असून दहिगाव वृक्षारोपण समिती व सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा यांच्या सहकार्यातून गावाच्या परिसरात वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे.

दहिगाव (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून पाणी संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. याकामासोबतच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखून येथील युवकांनी पुढाकार घेत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला, त्यामाध्यमातून दहिगाव वृक्षारोपण समिती स्थापन करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहकार्यातून वृक्षारोपण मोहिमला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी रस्त्याच्या दुतर्फा, तसेच स्मशानभूमी, प्राथमिक शाळा, वसना नदीच्या परिसरात लिंब, गुलमोहर, काशीद, बदाम, आंबा, चाफा अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली व प्रत्येक ग्रामस्थांना या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच वर्षभर ही मोहीम दरमहा राबवण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

Related posts: