|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » देशमुखनगरसह परिसरात कडकडीत बंद यशस्वी

देशमुखनगरसह परिसरात कडकडीत बंद यशस्वी 

वार्ताहर /देशमुखनगर :

‘मराठा आरक्षणा’साठी मराठा मोर्चा समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी देशमुनगरसह परिसरातील गावामधून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वायाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अपशिंगे (मि.), देशमुखनगर, अतीत, काशीळ, वेणेगाव, नांदगाव, कामेरी, अंगापूर,  फत्यापूर, निसराळे आदी गावांमधून शंभर टक्के बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील अपशिंगे शाळा, कॉलेज, दुध डेअऱया ही यावेळी बंद होत्या, तर वाहतूक देखील ठप्प झाली होती. बंदच्या पार्श्वभूमीवर बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील गावांमधून, तसेच महामार्गावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मराठा बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: