|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जात-उत्पन्न दाखला पाहिजे असल्यास दिवसभर रांगेत थांबा!

जात-उत्पन्न दाखला पाहिजे असल्यास दिवसभर रांगेत थांबा! 

बेळगाव/ प्रतिनिधी :

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसीलदार कार्यालयात जात-उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली आहे. यासाठी तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सर्वसामान्य नागरिकांची कामे तातडीने व्हावीत, तसेच जवळच्या परिसरात कागदपत्रे मिळावीत यासाठी काकती, उचगाव, एपीएमसी, बागेवाडी, सांबरा या भागात जनस्नेही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, काही केंद्रे बंद असल्यामुळे नागरिकांना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. सध्या विद्यार्थ्यांना शाळेतून शिष्यवृती मिळविण्यासाठी जात व उत्पन्नाचा दाखला सक्तीचा करण्यात  आला आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात जात-उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी विद्यार्थी-पालकांची गर्दी होत आहे.

  तहसीलदार कार्यालयात जात-उत्पन्नाच्या प्रमाणपत्राबरोबर रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, पेन्शन, विधवा प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे दिली जातात. बऱयाच जनस्नेही पेंद्रांमध्ये तांत्रिक अडचणी, सर्व्हर बिझी, विद्युत पुरवठा खंडित या कारणांमुळे नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहे. नवीन रेशनकार्ड मिळविण्यासाठी, शैक्षणिक प्रवेशासाठी, नोकरी संबंधी, शेतीविषयी, कर्ज व इतर शासनाच्या सोयी मिळविण्यासाठी उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे. मात्र, उत्पन्नाचा दाखला मिळविण्यापूर्वी तलाठी व मामलेदारांचा सही शिक्का बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांना तलाठी व मामलेदार कार्यालयांकडेही फेऱया माराव्या लागत आहेत.

 त्यातच सध्या तहसीलदार कार्यालयात एकच काऊंटर चालू असल्याने लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱयांवर अतिरिक्त ताण पडत असून त्याचा परिणाम त्यांच्या कामावर व वागणुकीवर दिसून येत आहे. त्यासाठी इतरत्र सुरू असलेल्या केंद्रांमधील काम सुरळीतपणे चालू ठेऊन नागरिकांना वेळेत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

Related posts: