|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापूर जिह्यात अघोषित बंद

सोलापूर जिह्यात अघोषित बंद 

विशेष प्रतिनिधी /सोलापूर :

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आज गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सोलापूर शहर – जिह्यात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजवर शांततेत 58 मोर्चे काढण्यासह तब्बल 27 जणांनांचे समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान जाऊनसुध्दा सत्ताधारी भाजप सरकार आरक्षण देण्यात चालढकल करीत असल्याच्या संतापाचा उद्वेग बाहेर काढत आक्रमक झालेल्या मराठा तरूणांनी सोलापुरातील छत्रपती संभाजी चौकात महादेवाच्या पिंडीला स्वतःच्या रक्ताने अभिषेक घातला.

   सोलापूर शहरानजीक संभाजी चौक, कोंडी आणि तुळजापूर रस्त्यावरील उळे येथे अनेक तरूणंनी मुंडन केले. जुना पुणे नाका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिया आंदोलनात प्रौढांनी उपोषण धरले होते. मराठा समाजाच्या वकील मंडळींसह तरूणी, महिला तसेच सर्वपक्षीय नेतेमंडळींनी तोंडाला काळ्या पट्टय़ा बांधून गांधीगिरीने मुक आंदोलन केले. आरक्षण देण्यासंदर्भात झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी संभाजीराजे चौकात भजनदेखील करण्यात आले.

   विशेषत्वे, सोलापूर शहर आणि जिल्हयात बंद शांततेत पार पडला असला तरी   आरक्षणाच्या मागणीवर पेटून उठलेल्या मराठय़ांच्या भावना तीव्र असल्याचे दिसून आले. माढा, माळशिरस तसेच पंढरपूर, मोहोळ, सांगोला, करमाळा आदी तालुक्यांमध्य़े कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र होते. जिह्यात कित्येक गावे  बंद करण्यात आली. बहूतांश गावांमधील नागरिकांनी चुली बंद ठेवून आरक्षणासाठीची मनामधील खदखद बाहेर काढली. बंदमुळे मुख्य सोलापूर – पुणे, सोलापूर  – हैदराबाद तसेच सोलापूर ते विजापूर हे राष्ट्रीय मार्ग अडले. या महामार्गांशिवाय जिह्यातील साधारण शंभराहून अधिक रस्त्यांवर मावळे आरक्षणाचा एल्गार करत उतरले होते.

     सोलापुरात बंदच्या पार्श्वभूमीवर, प्रचंड पोलीस पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन धरले होते. तर सकल मराठा समाजाच्यातर्फे जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी आंदोलनकर्त्यांची हजारोंच्या संख्येने गर्दी होती. आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले. 

Related posts: