|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मराठा आरक्षणः बंदला मिरजेत उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा आरक्षणः बंदला मिरजेत उत्स्फूर्त प्रतिसाद 

प्रतिनिधी /मिरज :

मराठा आरक्षणासाठी आयोजित मिरज बंदला गुरूवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार शंभर टक्के बंद होते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या लक्ष्मी मार्पेट, स्टेशन रोड, गांधी चौक परिसरात अक्षरशः शुकशुकाट होता. नागरिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरुन मोटारसायकल रॅली काढून शासकीय रुग्णालयासमोर रास्तारोकां आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पवार गल्लीतील घराघरातून पोळी-भाजी आणि कुमार देसाई यांनी पुलाव राईस पुरविल्याने त्याची घटनास्थळी चर्चा होती. यावेळी प्रांताधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे आणि राज्यात समाजाची सुरू असलेली बदनामी तात्काळ थांबवावी, यासह काही प्रमुख मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला पाठींबा म्हणून मिरज शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, रिक्षाचालक, भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले यांनी स्वतःहून आपले व्यवहार बंद ठेवून पाठींबा दिल्याने आज दिवसभर शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. मिरज आगाराने बसची शहर आणि ग्रामीण वाहतूकही बंद ठेवली होती. त्यामुळे समाजाला बंदसाठी कोणालाही आवाहन करावे लागले नाही. नागरिकांनीच बंदमध्ये सहभाग घेतल्याने आजचा बंद अतिशय शांततेत आणि शंभर टक्के प्रतिसादाने पार पडला.

Related posts: