|Friday, March 22, 2019
You are here: Home » leadingnews » सनातनच्या साधकाकडून 8 देशी बाँबसह स्फाेटकाचे साहित्य जप्त; सनातनने आरोप फेटाळला

सनातनच्या साधकाकडून 8 देशी बाँबसह स्फाेटकाचे साहित्य जप्त; सनातनने आरोप फेटाळला 

ऑनलाईन टीम / मुंबई: 

दहशतवाद विरोधी पथकानं एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ताे सनातनचा साधक असल्याचे सांगितले जात आहे. त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानं दहशतवादविरोधी पथकाच्या साहाय्यानं पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून आणि जवळच असलेल्या दुकानातून बाॅम्ब बनविणण्याचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान, सनातनच्या वकिलांनी हा आराेप फेटाळला आहे.

नालासोपा-यात काल रात्री दहशतवादविरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दहशतवादीविरोधी पथकाच्या छाप्यात 8 देशी बॉम्बसह स्फोटकं बनवण्याचं साहित्य सापडलं आहे. नालासोपा-यातील भांडार आळी भागात राहणा-या वैभव राऊत याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संशयितावर पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाची टीम पाळत ठेवून होती. अखेर त्याच्या घरावर छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.  ताे सनातन या संस्थेचा साधक असल्याचे समजते. 

Related posts: