|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News » ट्राफिक पोलिसांना मुळ कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही

ट्राफिक पोलिसांना मुळ कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मुळे कागदपत्रे सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरजा भासणार नाही. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिला आहे.

 

माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्राफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर किंवा एमपरिवहन ऍपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ ट्राफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्मयूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

 

 

Related posts: