|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला दिली शुल्क लादण्याची धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला दिली शुल्क लादण्याची धमकी 

ब्रिजवॉटर :

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत कॅनडाच्या वाहनांवर शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. मेक्सिकोसोबत व्यापार करारावर चांगली प्रगती होत असली तरीही कॅनडासोबत व्यापार करार न झाल्यास त्याच्या वाहनांवर शुल्क लादले जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले. न्यूजर्सीच्या बेडमिन्स्टर येथून ट्विट करत अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्यातील ‘नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ऍग्रीमेंट’ (नाफ्टा) वर पुन्हा चर्चा सुरू करण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. मेक्सिकोसोबत कोणत्याही प्रकारच्या करारात अमेरिकेच्या शेतकऱयांचा विचार केला जावा असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी यावेळी मेक्सिकोच्या नव्या अध्यक्षांचे कौतुक करत त्यांना अत्यंत सज्जन व्यक्ती ठरविले. कॅनडाने प्रतीक्षा करावी, त्यांचे शुल्क आणि व्यापारी अडथळे अधिक आहेत, सहमती न झाल्यास कॅनडाच्या उत्पादनांवर शुल्क आकारले जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

 

Related posts: