|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुर्वोतर आणि पश्चिम भारतीय संमेलनात कोकणी साहित्यिकांची छाप

पुर्वोतर आणि पश्चिम भारतीय संमेलनात कोकणी साहित्यिकांची छाप 

प्रतिनिधी/ मडगाव

केंद्रीय साहित्य अकादेमी आणि कच्छ विद्यापीठ गुजरात आयोजित पुर्वोतर आणि पश्चिम भारतीय संमेलनात, गोव्यातील कोकणी साहित्यिक आणि समिक्षकांनी विशेष छाप पाडली. आसाम, बोंडो, गुजरात, मणिपूर, नेपाळ, सिंधी आणि मराठी भाषेतील दिडशेहून अधिक साहित्यिक आणि समिक्षक या संमेलनात सहभागी झाले होते.

कच्छ विद्यापीठ गुजरात येथे झालेल्या या संमेलनात गोवा कोकणी सल्लागार समितीचे निमंत्रक प्रा. डॉ. भुषण भावे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच सदस्यसीय साहित्यिक व समिक्षक या संमेलनात सहभागी झाले होते. यात काव्य संमेलनात कोकणीतील युवा कवी रमेश साजू घाडी व डॉ. पुर्णानंद च्यारी यांनी आपल्या कोकणीतील कविता हिंदी आणि इंग्रजी भाषेत सादर करून रसिकांकडून वाहव्वा मिळविली. रमेश घाडी यांनी ‘गोंयची माती’ व ‘फोर मी इट वील नोट मॅटर ऍट ऑल’ तर डॉ. पुर्णानंद च्यारी यांनी ‘हॅप्पी बर्थ डे टू यू’ आणि ‘बारिश जरा थम ले’ या कविता पेश करून कोकणी काव्याची ओळख विविध भाषांतील साहित्यिकांना व रसिकांना करून दिली. गुजराती साहित्यिका दर्शना ढोलकिया आणि मराठी साहित्यिक रंगनाथ पाठारे यांनी या दोन्ही साहित्यिकांचे विशेष कौतूक केले.

कथाकथन सत्रात कोकणीतील कथाकार विन्सी क्वाद्रूश यांनी ‘दांडिया रास’ ही त्याची कथा सादर केली. गोव्यातील विविध भाषिक लोक, कॉर्पोरेट जीवन आणि दांडिया उत्सव या पार्श्वभूमीवरील कथेला प्रेक्षकांकडून दाद मिळाली. ‘स्वातंत्र्योत्तर साहित्यावर लोक साहित्याचा प्रभाव’ या विषयावर प्रा. नित्यानंद नाईक यांनी अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला.

डॉ. भूषण भावे यांनी कथाकथन सत्राचे संयोजन केले. या कथावाचनाच्या सत्राला मणिपूर, बोंडो, नेपाळ, आणि सिंधी भाषतेल्या कथाकारांनी कथाकथन केले. त्यांच्या कथाविषयी डॉ. भावे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. कच्छ-भुज, गुजरात येथे संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनात गोव्याच्या साहित्यिकांनी व समिक्षकांनी सिंधी, नेपाळी, मराठी, बोंडा, गुजरात, आसाम, वेगवेगळय़ा भाषेतील साहित्यिकांनी त्यांच्या भाषेतील साहित्याविषयी चर्चा करण्यात आली.

Related posts: