|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » ‘गणेश मूर्ती आणि राखी’ जीएसटी मुक्त

‘गणेश मूर्ती आणि राखी’ जीएसटी मुक्त 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रक्षा बंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज केली आहे.

रक्षा बंधन आणि गणेशोत्सव हा आपल्या परंपरेचा हिस्सा आहे. त्यामुळे या परंपरांचा सन्मान करायलाच हवा. त्यामुळे राखी, गणेश मूर्ती, हस्तशिल्प, हातमागाच्या वस्तू आदींना जीएसटीमधून वगळण्यात येत असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. गणेशोत्सव आणि रक्षाबंधनच्या काळात लोक मोठय़ प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे या दोन्ही सणांशी संबंधित वस्तुंना जीएसटीतून वगळण्यात आल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. या पूर्वी सरकारने सॅनिटरी नॅपकिनलाही जीएसटीतून वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आधी या उत्पादनावर 12 टक्के जीएसटी आकारला जात होता. त्याशिवाय स्त्रीयांचे दागिने, हेअर ड्रायर, परफ्यूम आणि हँड बॅगवरील जीएसटीही 28 टक्क्मयांवरून 18 टक्क्मयांवर आणण्यात आला होता.

Related posts: