|Friday, November 16, 2018
You are here: Home » क्रिडा » बेल्जियन धावपटू नॅरेट विजेता

बेल्जियन धावपटू नॅरेट विजेता 

वृत्तसंस्था/ बर्लीन

बेल्जियमचा 28 वर्षीय धावपटू कोयेन नॅरेटने रविवारी येथे झालेल्या युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धेतील पुरूषांची मॅरेथॉन जिंकली. त्याने ही मॅरेथॉन दोन तास, 9 मिनिटे आणि 51 सेकंदाचा अवधी घेत पूर्ण केली. नॅरेटची या स्पर्धेतील ही विक्रमी कामगिरी आहे.

या मॅरेथॉनमध्ये स्वीसच्या अब्राहमने रौप्यपदक मिळविले तर इटलीच्या रॅचिकने कास्यपदक घेतले. महिलांच्या विभागात बेलारूसच्या व्होला मेझुरोनेक विजेतेपद मिळविताना दोन तास, 26 मिनिटे आणि 22 सेकंदाचा अवधी घेतला. अंतिम टप्प्यात तिने आपल्या नजिकच्या फ्रान्सच्या क्लेव्हिनला मागे टाकले. क्लेव्हिनने रौप्यपदक तसेच झेकच्या निव्हेलटोव्हाने कास्यपदक मिळविले.

Related posts: