|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » दुसरी कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे

दुसरी कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

यजमान इंडिया अ आणि द. आफ्रिका अ यांच्यातील येथे सुरू असलेल्या चार दिवसांच्या दुसऱया आणि शेवटच्या अनाधिकृत कसोटी पावसाचा अडथळा आल्याने ही कसोटी अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे. या कसोटीतील तिसऱया दिवशी केवळ 33 षटकांचा खेळ झाला. द. आफ्रिका अ ने पहिल्या डावात 7 बाद 294 धावा जमवल्या असून अद्याप ते 51 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे तीन गडी खेळावयाचे आहेत.

या कसोटी मालिकेत इंडिया अ ने पहिली कसोटी जिंकून आघाडी मिळविली आहे. या दुसऱया सामन्यात इंडिया अ ने पहिल्या डावात 345 धावा जमवल्या आहेत. द. आफ्रिका अ ने आपला पहिला डाव 3 बाद 219 या धावसंख्येवरून पुढे सुरू केला आणि जवळपास दोन तासांच्या खेळात त्यांनी 75 धावांची भर घालताना 4 गडी गमविले. रविवारी सकाळी येथे मुसळधार पाऊस सुरू झाल्याने खेळाला निर्धारित वेळेपेक्षा तीन तास उशिरा सुरुवात झाली. इंडिया अ च्या अंकित रजपूतने डेर डय़ूसेनला 22 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर त्याने द. आफ्रिका अ ला आणखी एक धक्का देताना सेकंडला तंबुत धाडले. सेकंडने 7 चौकारांसह 47 धावा जमविल्या. यादवने प्रेटोरियसचा बळी मिळवला. त्याने 10 धावा केल्या. मोहम्मद सिराजने पिडेटला 22 धावांवर त्रिफळाचित केले. त्याने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. मुथूसॅमी 3 चौकारांसह 23 धावांवर खेळत आहे. इंडिया अ तर्फे मोहम्मद सिराज, रजपूत आणि चहाल यांनी प्रत्येकी 2 तर यादवने 1 गडी बाद केला. सोमवारी खेळाचा शेवटचा दिवस असून हा सामना अनिर्णीत अवस्थेकडे झुकला आहे. पण इंडिया अ ने ही मालिका यापूर्वीच जिंकली आहे. सोमवारी येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

संक्षिप्त धावफलक

इंडिया अ प. डाव-सर्वबाद 345, द. आफ्रिका अ प. डाव-92.3 षटकात 7 बाद 294 (हमझा 93, इर्व्ही 58, सेकंड 47, मुथूसॅमी खेळत आहे 23, पिडेट 22, डय़ूसेन 22, सिराज, रजपूत, चहाल प्रत्येकी 1 बळी)