|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » किरकोळ कारणावरून पतीने कापले पत्नीचे नाक

किरकोळ कारणावरून पतीने कापले पत्नीचे नाक 

ऑनलाईन टीम / लखनौ :

किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचे नाक चावल्याची घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये घडली आहे. रक्ताने माखलेल्या पत्नीला नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलेचे नाव पूजा असे आहे.

तीज या सणासाठी बाजारातून बांगडय़ा आणताना पूजाचे तिचा पती अर्जुनसोबत रस्त्यातच वाद झाला. यानंतर रागावलेल्या अर्जुनने महिलेचे नावे चावले. यामध्ये पूजा गंभीर जखमी झाली असून तिच्या नातेवाईंकांनी रुग्णालयात दाखल केले. “पती अर्जुन माझ्यावर संशय घेत असे. दारु पिऊन कायम मारहाण करत असे. मारहाणीला विरोध केल्यावर सासरची मंडळी दरदिवशी मला मारायचे. या कृत्यात सासू, दीर, जाऊ हे पतीला सहकार्य करायचे,‘असे पूजाने सांगितले. दोन-तीन दिवसांपूर्वीही पूजा आणि अर्जुन यांचा वाद झाला होता. यानंतर पंचायतही भरली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांची समजूत घालून प्रकरण शांत केले. पण तरीही पूजाच्या माहेरी जाण्यावरुन अर्जुनचा तिच्यासोबत वाद झाला. माहेरी जाऊ नये यासाठी पूजावर दबाव टाकू लागला. ‘वर्षात हाच एक सण येतो आणि त्यासाठी माहेरी गेले नाही तर मैत्रिणी आणि गाववाले काय विचार करतील,’ असे पूजा म्हणाली. यावरुन संपूर्ण कुटुंबाने रात्री तिला मारहाण केली. सकाळ झाल्यावर पती दारु पिऊन आला. बांगड्या घेऊन देण्याच्या बहाण्याने तो तिला स्वतःसोबत घेऊन गेला आणि गावाबाहेर जाताच तिला मारहाण केली. यानंतर त्याने पूजाचे नाव करकचून चावले, तिच्या नाकामधून रक्त येऊ लागले. यानंतर पूजाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केली.