|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » सर्व्हर हॅक करून कॉसमॉस बँकेला 94 कोटींचा गंडा

सर्व्हर हॅक करून कॉसमॉस बँकेला 94 कोटींचा गंडा 

ऑनलाईन टीम / पुणे :

गणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर सायबर हल्ला झाला असून हॅकरने जवळपास 15 हजाराहून अधिक व्यवहार करुन व्हिसा आणि रुपे कार्डद्वारे तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये हाँगकाँगला वळते केले आहेत. या सर्व प्रकारामुळे बँक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

हा प्रकार 11 ऑगस्टला दुपारी 3 ते रात्री 10 आणि 13 ऑगस्टला सकाळी साडेअकरापर्यंत घडला. 11 ऑगस्टला झालेल्या हल्ल्यात कॅनडा सह 24 देशातून केवळ 2 तासात 80 कोटी रुपये काढले गेले. तर 13 ऑगस्टला दुपारी 13 कोटी 92 लाख रुपये काही मिनिटांत हाँगकाँगमधील एका खात्यात वळविण्यात आले व तातडीने ते काढून घेतले गेले.याबाबत बँकेच्या एका वरिष्ठांनी सांगितले की, शनिवारी जेव्हा हा सायबर हल्ला झाला त्यात एकाचवेळी इतके इंटरनॅशनल व्यवहार होत असल्याचे पाहून व्हिसा कार्ड देणाऱया कंपनीने ही बाब रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तातडीने कॉसमॉस बँकेला याची कल्पना दिली. रविवारी संपूर्ण दिवस बँकेचे अधिकारी व तज्ञ या सर्व व्यवहाराची माहिती घेत होते. त्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा झालेल्या सायबर हल्ल्यात 13 कोटी 92 लाख रुपये हाँगकाँगला वळविण्यात आले.