|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » क्रेनच्या धडकेत तीन तरूणींचा मृत्यू

क्रेनच्या धडकेत तीन तरूणींचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नागपूर :

नागपूरमधील अंबाझरी टी पॉईंटवर भीषण अपघात झाला. क्रेनने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरूणींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

अंबाझरी टी पॉईंट इथे मेट्रोचे काम सुरू आहे. या कामामुळे आजूबाजूचा परिसर अरूंद झाला असून रस्त्याव खड्डेही प्रचंड झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास तिथे असलेली क्रेन क्लिनरशिवाय रिव्हर्स येत होती. तर तीन तरूणी ऍक्टिव्हावरून ट्रिपल सीट येत होत्या. यावेळी वेगाने मागे असलेल्या क्रेनने ऍटिव्हाला जोरदार धडक दिली आणि तिन्ही क्रेनच्या खाली आल्या. यात ऍक्टिव्हावरील दोघींचा जागीच मृत्यू  झाला तर एका तरूणीने वोकहार्ट रूग्णालयात प्राण सोडले.