|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » राजीव गांधी दलितविरोधी होते : नरेंद्र मोदी

राजीव गांधी दलितविरोधी होते : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हे दलितविरोधी होते, दलितांना हक्क मिळू नयेत यासाठी त्यांनी संसदेत मोठमोठी भाषणंही केली आहेत. हे सगळं रेकॉर्डवर आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.मंडल कमिशनच्या विरोधातील राजीव गांधींचं भाषण आजही उपलब्ध असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभर दलितांवर होत असलेले अन्याय, अत्याचार आणि ऍट्रॉसिटी कायद्यावरुन सुरु झालेली चर्चा यामुळे भाजप अडचणीत आली होती. त्याला मोदींनी ’जागरण’ या वृत्तपत्राच्या मुलाखतीतून उत्तर दिले होते. भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे, जो दलितांच्या उद्धारासाठी कटिबद्ध आहे, असा दावा मोदींनी केला आहे. शिवाय मोदींनी येत्या तीन राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचंही भाकीत केलं आहे.