|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार 

ऑनलाईन टीम / मुंबई

भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी 12 वाजता वाडेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात 15 ऑगस्ट रात्री झाले. वाडेकर 77 वर्षांचे होते. अजित वाडेकर यांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. वरळीतील राहत्या घरी आज अजित वाडेकरांचे पार्थिव सकाळी दहा वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अजित वाडेकर यांची दोन्ही मुले परदेशात असल्यामुळे त्यांचे अंत्यविधी आज करण्यात येणार आहेत. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वात भारताने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱयात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.

 

Related posts: