|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या

नाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या 

प्रतिनिधी / वैभववाडी:

नाधवडे-नवलादेवी येथील चंद्रकांत सखाराम पडेलकर (75) यांनी स्वमालकीच्या गुरांच्या गोठय़ात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी, चंद्रकांत पडेलकर यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या दोन्ही मुली विवाहित आहेत. घर मोडकळीस आल्याने ते नजीकच स्वमालकीच्या गुरांच्या गोठय़ात वास्तव्य करीत होते. त्यांना आरोग्याच्या समस्याही भेडसावत होत्या. शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत गोठय़ामध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जयश्री भोमकर, हवालदार श्री. दळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.