|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्यार्थीच देशाच्या लोकशाहीचे शीलेदार

विद्यार्थीच देशाच्या लोकशाहीचे शीलेदार 

एनसीसीच्या ऑननरी मेजर डॉ. रूपा शहा यांचे मत

प्रतिनिधी / कोल्हापूर

राष्ट्रीय एकात्मता लहान मुलांमध्ये रूजवली पाहिजे, कारण ही मुलेच लोकशाहीचे शीलेदार आहेत, असे मत एनसीसीच्या ऑननरी मेजर डॉ. रूपा शहा यांनी व्यक्त केले.

शिवाजी पेठेतील प्रतापसिंह तरूण मंडळातर्फे स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. दि. कोल्हापूर को. ऑप. बँकेचे संचालक जयसिंगराव माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आदर्श बालमंदिर प्राथमिक शाळेतील 350 विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी जिलेबी वाटप करण्यात आली. 

डॉ. शहा म्हणाल्या, प्रतापसिंह तरूण मंडळाने अखंडपणे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम घेवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. तसेच लहान मुलांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची बिजे रूजवणे काळची गरज आहे. त्यामुळे या मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंडळाचे अध्यक्ष रविंद्र मोहिते यांनी उपस्थित मान्यवरांना गणेशमुर्ती देवून स्वागत केले. प्रविण बोडके यांनी सुत्रसंचालन केले.  यावेळी ज्येष्ठ नागरिक अशोक पाटील, शशिकांत खांडेकर, माणिक खांडेकर, महादेव बोडके, अमोल कापडे, अभिजित खांडेकर, अविनाश डकरे,

Related posts: