|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Automobiles » मारूती सुझूकीची नवी Swift Hybrid येणार

मारूती सुझूकीची नवी Swift Hybrid येणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मारूती सुझूकीने त्यांची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचं हायब्रिड व्हर्जन लॉन्च केलं आहे. इंडोनेशियामध्ये पार पडलेल्या ऑटो शोमध्ये या कारची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. स्विफ्ट्चे हे पहिलेच हायब्रिड व्हर्जन नाही. जपानमध्येही जुलै 2017 साली मारुती सुझूकीचं हायब्रीड व्हर्जन लॉन्च करण्यात आलं होतं. लवकरच ही कार भारतीय बाजारातही दाखल होण्याची शक्यता आहे. 

कधी होणार लॉन्च, काय असेल किंमत ? 

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतामध्ये 2019 साली स्विफ्ट हायब्रिड लॉन्च केली जाणार आहे. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात ही कार बाजारात येऊ शकते. या कारची किंमत अंदाजे 7 लाख असण्याची शक्यता आहे. 

Related posts: