|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » सॅमसंग गॅलक्सी नोट 9 भारतात सादर

सॅमसंग गॅलक्सी नोट 9 भारतात सादर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येथील कार्यक्रमात सॅमसंग गॅलक्सी नोट 9 हा स्मार्टफोन भारतीय बाजारापेठेत सादर करण्यात आला. चालू महिन्याच्या अमेरिकेत तो दाखल करण्यात आल्यानंतर भारतात त्याची नोंदणी सुरू झाली होती. या स्मार्टफोनमध्ये ब्लुटुथ आधारित असणारे एस पेन आणि अतिरिक्त मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 1 टीबीपर्यंत स्टोरेज वाढविता येईल. 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेजच्या फोनचे मूल्य 67,900 रुपये आणि 8 जीबी रॅम, 512 जीबी स्टोरेज  हॅन्डसेटची किंमत 84,900 रुपये अशा दोन प्रकारात तो सादर करण्यात आला.

शुक्रवार, 24 ऑगस्टपासून हा स्मार्टफोन ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, सॅमसंग मोबाईल स्टोअर आणि ऑफलाईन दुकानांत खरेदीसाठी उपलब्ध असेल. स्मार्टफोन खरेदीसाठी ईएमआयसह अनेक ऑफर्स सुरू आहेत. अमेरिका आणि अन्य बाजारपेठेत क्वॉलकॉम स्नॅपडॅगन 845 प्रोसेसरचा वापर आहे, मात्र भारतात सॅमसंगच्या एक्सिनोस 9810 या प्रोसेसरचा वापर आहे. मिडनाईट ब्लॅक आणि मेटॅलिक कॉपर रंगातील फोनसह मॅचिंग होणारे एस पेन, तर ओशन ब्लू रंगासह पिवळय़ा रंगाचे एस पेन असेल. नोएडातील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पात त्याची निर्मिती करण्यात येत आहे.

या फोनची खास वैशिष्टय़े

डिस्प्ले…………. 6.4 इंच सुपरएमोलेड

प्रोसेसर………… एक्सिनोस 9810

मुख्य कॅमेरा…… 12+12 मेगापिक्सल

सेल्फी कॅमेरा….. 8 मेगापिक्सल

ऑपरेटिंग प्रणालाr           ऍन्ड्रॉईड 8.1

रॅम 6/8 जीबी, स्टोरेज 128/512 जीबी

बॅटरी     4000 एमएएच