|Sunday, November 18, 2018
You are here: Home » उद्योग » न्यु होंडा अमेझची तीन महिन्यात 30 हजार विक्री

न्यु होंडा अमेझची तीन महिन्यात 30 हजार विक्री 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

तीन महिन्यापुर्वी प्रथम होंडा कार इंडियाकडून न्यु होंडा अमेझ कारचे सादरी करण करण्यात आले होते. कार सादरीकरणानंतर कंपनीच्या न्यु अमेझ कारची 30 हजार युनिट्स विक्री झाल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

भारतात होंडा कार 20 वर्षांच्या इतिहासात न्यु अमेझ सर्वात वेगाने विक्री होणारी कार म्हणून नोंद करण्यात आली आहे. सर्वात प्रथम ऑटो एक्सपो 2018 मध्ये या कारचे सादरीकरण करण्यात आले होते. हि कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन असणारी आहे. ऑटोमॅटीक गिअर बॉक्सची सुविधा देण्यात आली आहे.

ऑल न्यु अमेझ कारने मिळालेल्या या यशानंतर भविष्यात नवीन व्यासपीठ तयार करण्यात येणार असून या मॉडेलमध्ये आधुनिक बदल करण्यात येणार असल्याचे  होंडा कार इंडियाचे डायरेक्टर माकोता यांनी यावेळी सांगितले आहे.

ग्राहकांमध्ये ऑटोमॅटीक गिअर बॉक्स असणारे मॉडेल प्रसिद्ध होत आहे. एकूण विक्रीत 30 टक्के भाग हा ऍटोमॅटीक गिअर बॉक्स असणाऱया कारचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच 10 हजार युनिट हिस्सा असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

Related posts: