|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » भांडवली बाजाराचा नवीन विक्रम स्थापित

भांडवली बाजाराचा नवीन विक्रम स्थापित 

वृत्तसंस्था /मुंबई :

बाजार  नवीन उंचीचा पाठलाग करत बंद झाला आहे. वधारलेल्या बाजारात वातावरण निरुउत्साह दिसून आला आहे. निफ्टी 11,600 वर पोहोचण्यात यशस्वी झाली. तर सेन्सेक्स 38,500 जवळ गेला होता. बाजारात शेवटच्या काही क्षणात सेन्सेक्स आणि निफ्टी स्थिर होत बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दबाव दिसून आला तर बीएसईचा मिडकॅप निर्देशाकांत 0.2 टक्क्यांची थोडी वाढीसह बंद झाला. निफ्टीचा मिडकॅपचा निर्देशाक 0.2 टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. तर बीएसईच्या स्मॉलकॅपचा निर्देशाक 0.15 टक्के घसरण झाली.

बीएसईच्या प्रमुख 30 शेअर्सच्या निर्देशाकात सेन्सेक्स51 अंक म्हणजे 0.15 टक्के वाढीसह 38,337 वर बंद झाला. तर एनएसई च्या मुख्य 50 शअर्स मध्ये निफ्टी 12 अंकानी म्हणजे 0.1 टक्के वाढ होऊन 11,583 वर बंद झाला.

 दिवसभर व्यवहारात बँकिंग, धातू. आणि माध्यम याच्या समभागाच्या विक्रीत दबावाचे वातावरण दिसून आले. तर बँक निफ्टीत 0.8 टक्के घसरणीसह 28,028 पातळीवर बंद झाला. तर आयटी एफएमसीजी औषध .रियल्टी कॅपिटल गुड्स आणि वीज यांच्या समभागात खरेदीचे चित्र दिसून आले.

दिग्गज कंपन्याच्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा एल ऍण्ड टी,एनटीपीसी, डॉ,रेड्डीज लॅब, एचसीएल टेक ,रिलायन्स इंडस्ट्रिज, पॉवर ग्रीड यात 2.4 ते 1.5 टक्के वधारत बंद झाल्या. तर टाटा मोटस। बीपीसीएल, आयओसी, एचपीसीएल, हिंडाल्को, वेदान्ता , टाटा स्टील, बजाज ऑटो आणि एसबीआय या कंपन्याचे समभाग 4.5ते1.5 अंकानी स्थिर होत बंद झाले आहेत. मिडकॅप शेअर्समध्ये जीएसके ,मॅरिको, युनायटेड ब्रुअरीज , एबीबी इंडिया आणि डिव्हीज लॅब याच्या समभागात 5.4 ते 4 टक्क्यांची उसळी घेत बंद झाला आहे.

स्मॉलकॅप शेअर्समध्ये डीसीडब्ल्यु ,बॉम्बे बर्मा, एशियन ग्रेनिटो, मार्कस फार्मा या कंपन्याचे समभाग 19.8 ते 9 टक्क्यांनी मजबुत होत बंद झाले आहेत.