|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादई निवाडय़ाचा गोव्यावर परिणाम नाही

म्हादई निवाडय़ाचा गोव्यावर परिणाम नाही 

प्रतिनिधी /पणजी :

कर्नाटकला केवळ 3.9 टीएमसी पाणी वळविण्यास लवादाने मान्यता दिली आहे. हे पाणी वळविण्यासाठी वन आणि पर्यावरण मंत्रालयाची मान्यता घ्यावी लागणार आहे. एवढे पाणी जरी कर्नाटकने वळविले तरी त्याचा फार मोठा परिणाम गोव्याच्या पर्यावरणावर होणार नसल्याचे जलस्त्रोत खात्याचे मंत्री विनोद पालयेकर, मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी, चेतन पंडित यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर लावादाच्या निर्णयाला गोवा सरकार न्यायालयात आव्हान देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लावादाने दिलेला निकाल गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कर्नाटकाला केवळ 3.9 टीएमसी पाणी वळविण्यास मान्यता दिली आहे. हायड्रो प्रकल्पाला जे 8.5 टीएमसी पाणी वापरण्यास मान्यता दिली आहे ते पाणीही परत गोव्यातच येणार आहे. त्यामुळे त्याबाबत फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. म्हादई खोऱयामध्ये 188.06 टीएमसी एवढे पाणी आहे, असेही ते म्हणाले.

गोव्याला आता 33 टीएमसी पाणी मिळणार

या अगोदर गोवा 9 टीएमसी एवढे पाणी वापरत होता. आता एकूण 33 टीएमसी पाणी गोव्याला मिळणार आहे. म्हादईच्या पाण्यासंदर्भात गोवा सरकार गंभीर आहे. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. त्यामुळे गोव्याच्या हिताच्या दृष्टीने सरकारने म्हादईचा विषय गांभीर्याने घेतला आहे. म्हादईचा लढा गांभीर्यानेच लढला गेला. लवादासमोर शेवटची सुनावणी 21 फेब्रुवारीला झाली. 14 ऑगस्टला लवादने आपला निकाल दिला. म्हादईसाठी फायदेशीर बाजू मांडणाऱया टीमने चांगली कामगिरी केली. लवादाचा निवाडा 2011 पानांचा आहे.

लवादाच्या निकालावर उलटसुलट प्रतिक्रियह व्यक्त करण्यात आल्या. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये व म्हादई संदर्भातले वास्तव जननेला कळायला हवे, यासाठी ही माहिती उपलब्ध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: