|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण, रोहन बोपण्णा-दिवाज शरण जोडी विजयी

भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण, रोहन बोपण्णा-दिवाज शरण जोडी विजयी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भारतीय टेनिस संघाने इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीने कझाकिस्तानच्या जोडीवर मात केली.

 

कझाकिस्तानच्या डेनिस येवस्येव आणि अलेक्झांडर बब्लकि यांच्याविरुद्ध खेळणाऱया भारतीय जोडीने पहिल्या सेटमध्ये आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. दोन्ही खेळाडूंना रोहन आणि दिवीजने पुनरागमन करण्याची संधी दिलीच नाही. अखेर 6-3 च्या फरकाने पहिला सेट जिंकत भारतीय जोडीने सामन्यात आघाडी घेतली.

 

Related posts: