|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » मॅन ट्रक्सचा पितांबर प्रकल्प फोर्स मोटर्स करणार खरेदी

मॅन ट्रक्सचा पितांबर प्रकल्प फोर्स मोटर्स करणार खरेदी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुणे येथील फोर्स मोटर्स लिमिटेडने मॅन ट्रक्सचा पितांबर येथील प्रकल्प खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. मॅन ट्रक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या मूळ जर्मन असणाऱया कंपनीची मध्य प्रदेशातील स्थावर आणि अस्थावर संपत्ती खरेदी करणार आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये सदर व्यवहार किती रुपयांना झाला याची माहिती देण्यात आलेली नाही. ऑक्टोबर अखेरपर्यंत दोन्ही कंपन्यांतील व्यवहार पूर्ण होईल असे सांगण्यात आले.

मॅन ट्रक ऍण्ड बस एजी या कंपनीने आंतरराष्ट्रीय व्यवसायाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे, असे चालू महिन्याच्या सुरूवातीला सांगितले होते. यानुसार भारतातील काही संपत्ती विक्री करण्यात येत आहे. कंपनीने आता प्रिमियम वाहन क्षेत्रावर लक्ष देण्याचे ठरविले आहे. सध्या असलेल्या मागणीचा पुरवठा पूर्ण झाल्यानंतर सीएलए प्रकारातील वाहनांची निर्मिती, विक्री आणि निर्यात थांबविण्यात येणार आहे.

मॅन ट्रक्स इंडियाचे कंपनीकडून आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी संशोधन आणि विकासाचे काम करणार आहे.

 असे सांगण्यात आले. 2006 मध्ये भारतात व्यवसायाला सुरूवात केल्यापासून कंपनीने आतापर्यंत 25 हजारपेक्षा अधिक ट्रकांची विक्री केली आहे.