|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इचलकरंजीत सावता माळी समाधी महोत्सव उत्साहात

इचलकरंजीत सावता माळी समाधी महोत्सव उत्साहात 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथील वीरशैव लिंगायत माळी समाजाच्यावतीने संत सावता माळी समाधी उत्सव सोहळा विविध उपक्रमांनी व कार्यक्रमांनी साजरा उत्साहात साजरा करण्यात आला.

संत सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवनाकवाडी येथील श्री पंत सेवा भजनी मंडळाच्यावतीने संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच महिला मंडळाच्यावतीने समाजातील महिलांसाठी पारंपारिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच निवड झालेल्या समाजातील व्यक्तींचा सत्कार आणि इयत्ता 10 व 12 वीमधील गुणवंतांचा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, उपनगराध्यक्षा सौ. सरीता आवळे, नगरसेवक युवराज माळी, सौ. शुभांगी माळी या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दुपारच्या सत्रात समाजातील मुला-मुलींचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर   सायंकाळच्या सत्रात जादूचे प्रयोग पार पडले. यावेळी समाज अध्यक्ष किशोर माळी, संजय माळी, रमेश माळी, दत्ता माळी, विनोद कारंडे, आनंदा माळी, दीपक माळी, हरी माळी, दर्याप्पा माळी, निखिल माळी, बाळासो माळी, आण्णासो माळी, वसंत गोंधळी, निलेंद्र माळी, आनंदराव माळी, पंकज माळी, नवनाथ माळी, सागर माळी, सुरेश माळी, सुरेंद्र माळी, सौ. पुनम माळी, रुपा माळी, वैशाली माळी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.