|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चालत्या कदंबाला लागली आग

चालत्या कदंबाला लागली आग 

चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशी बचावले

प्रतिनिधी/ पणजी

 पणजीहून वास्को येथे जात असलेल्या कदंबला काल शुक्रवारी बांबोळी येथे आग लागली. संपूर्ण बसगाडी आगीत जळाली आहे. सुमारे 8 लाखाचे नुकसान झाले आहे. या गाडीतून 40 प्रवासी प्रवास करीत होते. कदंबातील वाहक आणि चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांच्या जीवावरील धोका टळला. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.

वस्को येथे जात असलेली जीए-03-एक्स-0252 क्रमांकाची कदंब गाडी बांबोळी येथे पोचली असता गाडीच्या केबिनमध्ये अचानक आगीने पेट घेतला. चालकाने वेळीच इंजीन बंद करून प्रवाशांना गाडीतून खाली उतरविले. सुमारे 40 प्रवासी गाडीतून प्रवास करीत होते. गाडीला आग लागल्याचे कळताच प्रवासी गाडीतून खाली उतरले आणि आपला जीव वाचविला.

केबिनमध्ये असलेल्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्कीट होऊन आगीने पेट घेतला होता. चालकाला आग लागत असल्याची जाणीव होताच त्याने त्वरित गाडीचे इंजिन बंद केले आणि मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाचे अधिकारी नीलेश फर्नांडिस, गणेश गोवेकर व विनायक फडते यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे काम केले.