|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » भाऊ रंगारींनी केली गणेशोत्सवाची सुरूवात ;पुणे मनपाच्या वेबासाईटवर माहिती

भाऊ रंगारींनी केली गणेशोत्सवाची सुरूवात ;पुणे मनपाच्या वेबासाईटवर माहिती 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली? लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी? यावरुन यावषीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्मयता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली आहे.

मागच्या वषी शतकोत्तर रौप्य महोत्सवात गणेशोत्सवाची सुरूवात कुणी केली यावरूनमोठा वाद निर्माण झाला होता . भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे म्हणत भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. यावषीचा गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधी पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर रंगारी यांनी सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे नमूद केले आहे.

रंगारी यांनी पुण्यात 1892 साली सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, असं वेबसाईटवर म्हटलं आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण? या वादावर पडदा पडतो की नवा वाद सुरु होतो याकडे लक्ष लागले आहे.

 

Related posts: