|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानातील मंत्र्यांना आता साध्या राहणीमानाची सक्ती

पाकिस्तानातील मंत्र्यांना आता साध्या राहणीमानाची सक्ती 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली

पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या मंत्रिमंडळाने नवनविन बदल आमलात आणले आहे. यापैकी मुख्य म्हणजे येथील राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, सरन्यायाधीश, सिनेटचे अध्यक्ष, नॅशनल असेंम्ब्लीचे अध्यक्ष यांनी हवाई प्रवास करताना प्रथमवर्गातून प्रवास करू नये असा निर्णय घेतला आहे. याचबरोबर कार्यालयीन वेळेत देखिल बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर केवळ देशांतर्गत प्रवासासाठीच सरकारी विमानाचा वापर करण्याची मुभा दिली आहे.

तसेच सर्व कार्यालयांची शनिवारची सुट्टी रद्द करून केवळ रविवारी सुट्टी असेल, देशाची प्रतिमा बदलण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Related posts: