|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

बुध. दि. 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2018

मेष

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, तुळेत शुक्र प्रवेश होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील अडचणी कमी होतील. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. सप्ताहाच्या  शेवटी मनाप्रमाणे घटना घडेल. संसारात मंगळवार, बुधवार, वाद होईल. धंद्यात किरकोळ समस्या येईल. कोर्टाच्या कामात यश मिळवता येईल. जमीन, घर, इ. खरेदीचा विचार करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने मेहनत घ्यावी. म्हणजे यश मिळेल. चांगली संगत ठेवावी.


वृषभ

चंद्र, बुध त्रिकोण योग, तुळेत शुक्र प्रवेश करेल.  महत्त्वाच्या कामाचा आळस करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांच्याकडे लक्ष द्या व पूर्ण करा. धंदा मिळेल. थकबाकी मिळवा. सप्ताहाच्या शेवटी संसारात अडथळे वाढतील. विद्यार्थी वर्गाने खोटेपणाने वागू नये. त्यामुळे तुमचेच नुकसान होईल. कला, क्रीडा  क्षेत्रात नवीन ओळख होईल. कोर्टाच्या कामात सावध रहा.


मिथुन

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, तुळेत शुक्र प्रवेश होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. पद मिळेल. योजना मार्गी लावा. कठीण प्रश्न सोडवा धंदा मोठा होईल. मुलांची प्रगती होईल. जीवनसाथीची मर्जी राखता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व पैसा मिळेल. कोर्टकेस संपवता येईल. वेळ लावू नका. विद्यार्थ्यांला मनाप्रमाणे यश मिळेल. नोकरी लागेल.


कर्क

बुध, गुरु केंद्रयोग, तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात प्रगतीचे नवे टोक गाठता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला येणारी अडचण त्रासदायक ठरेल. मंगळवारपासून सर्वच कामात पुढे जाता येईल. धंदा वाढेल. थकबाकी वसूल करा. घरात अचानक खर्च निर्माण होईल. प्रवास करावा लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन परिचय असल्याने तुमचा उत्साह वाढेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये.


सिंह

चंद्र, गुरु त्रिकोण योग, तुळेत शुक्राचे राश्यांतर तुमच्या कार्याला अधिक वेगाने पुढे नेण्यास मदत करेल. राजकीय-सामाजिक कार्यात वर्चस्व दिसेल. धाडस दाखवता येईल. धंद्यात मंगळवार, बुधवारी अडचणी वाढतील. पुढील आठवडय़ात तुमचे काम सोपे होईल. मित्र मदत करतील. कल्पनाशक्ति वाढेल. नवीन कलाकृती तयार होईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकदार यश मिळेल. कोर्टकेस संपवा, परीक्षेत यश येईल.


कन्या

चंद्र,बुध त्रिकोण योग, तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. व्यवसायात नवे कंत्राट मिळवता येईल. शांतपणे समस्या सोडवा. हा सप्ताह कटकटीचा वाटू शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात नम्रता ठेवा. कमीच बोला. काही प्रश्न तटस्थ राहून सोडवा. घरातील व्यक्तीचे सहाय्य, मित्रांचे सहाय्य मिळेल. कला- क्रीडा क्षेत्रात संधी घ्या. परीक्षेसाठी तयारी करा. जिद्द ठेवा. कोर्टकेस चिंता निर्माण करू शकते.


तुळ

सूर्य, चंद्र त्रिकोण, तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात काम करा. थांबू नका. मदत मिळत राहील. तुमची प्रति÷ा वाढेल. धंद्याला सुरुवात होईल.पैसे जपून ठेवा. सप्ताहाच्या मध्यावर एखादी घटना मनस्ताप देणारी ठरू शकते. घरात वाद होईल, कला- क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. वाहन जपून चालवा. धाडस नको. परीक्षेसाठी तयारी होईल.


वृश्चिक

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय राजकीय, सामाजिक कार्यांत घेता येईल. विरोधक तणाव करतील. धंद्यात  लक्ष द्या. नवीन काम मिळेल. नोकरीत वरि÷ तुमच्याकडे मोठे काम देतील. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनतीचे यश मिळेल. घरातील समस्या किरकोळ असतील. स्वत:च्या खाण्याची काळजी घ्या. परीक्षेसाठी मेहनत घ्यावीच लागेल.


धनु

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे. या सप्ताहात राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. योजना पूर्ण करण्याची तयारी ठेवा. धंद्यात संधी मिळेल. विचारांअंती निर्णय घ्या. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. तुमची स्पर्धाही आकर्षक ठरेल. परीक्षेत यश मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. मागे राहू नका.


मकर

साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. सूर्य,चंद्र षडाष्टक योग. तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. प्रत्येक दिवस  तुम्हाला प्रगतीकडे नेणारे आहे. गर्व नको. विचार करून बोला. राजकीय सामाजिक कार्यात लोकप्रियता मिळेल. टिकात्मक बोलणे ऐकावे लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात कष्ट पडतील. संधी मिळेल. परीक्षेसाठी कष्ट घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. कोर्टाच्या कामात दूरदृष्टीने वागा. धंद्यासाठी आलेल्या संधीचा विचार करा.


कुंभ

सूर्य, चंद्र त्रिकोण योग, तुळेत शुक्राचे राश्यांतर यामुळे तुमच्या सर्वच कार्याला वेग प्राप्त होईल. राजकीय, सामाजिक कार्यातील दोष दूर करून चांगले संघटन तयार करता येईल. प्रति÷ा वाढेल. धंद्यात काही समस्या असतील. मार्ग मिळेल. नोकरीतील काम कमी करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकीक व पैसा मिळेल. परीक्षेसाठी चांगली तयारी करता येईल. कोर्टकेस संपवता येईल. घरात शुभ समाचार मिळेल.


मीन

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, तुळेत शुक्र प्रवेश करीत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यावर आरोप येण्याची शक्मयता आहे. धंदा मिळेल. मोठे काम घेऊन ठेवा. अहंकाराची भाषा कुठेही उपयोगी पडणार नाही. नोकरीत वरि÷ांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या. कला, क्रीडा क्षेत्रात आहे ते काम टिकवा. परीक्षेसाठी मन एकाग्र करा. भलते विचार करू नका. संसारात किरकोळ समस्या असेल.