|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिह्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल

जिह्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल 

26 सप्टेबर रोजी मतदान, 27 रोजी मतमोजणी

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राज्यातील कोल्हापूरसह 26 जिह्यातील 1 हजार 41 ग्रामपंचायतींसाठी येत्या 26 सप्टेबर रोजी मतदान होणार आहे. तर 27 सप्टेबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 69 गावात सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे.एस.सहारिया यांनी याची घोषणा केली. त्यामुळे या ठिकाणी आचारसंहिता सुरु झाली आहे. दरम्यान कोल्हापूर जिह्यातील 18 ग्रामपंचायतींसाठी चुरशीच्या लढती होणार आहे.

भुदरगड तालुक्यातील निळपण, गडहिंग्लज, आत्याळ, नांगनूर, तनवडी,  हनमंतवाडी, शिरोळ तालुक्यातील आगर, टाकळी, कागल तालुक्यातील चेडाळ सुरुपली, सावर्डे खुर्द, करवीर तालुक्यातील केर्ले चंदगड तालुक्यातील आमरोळी, गणूचीवाडी, मिरवे, मौजे कारवे, मजरे कारवे, चंदगड, उत्साळी या गावांचा यामध्ये समावेश आहे. निवडणुका होणाऱया ग्रामपंचायतींची जिल्हावार संख्या पुढीलप्रमाणे-सांगली 3 , सातारा 49, सोलापूर 61, रत्नागिरी 19, सिंधूदूर्ग 4, पुणे 59, ठाणे 6, रायगड 121, नाशिक 24, धुळे 83, जळगाव 6, अहमदनगर 70, नंदूरबार 66, बीड 2, नांदेड 13, उस्मानाबाद 5, लातूर 3, अकोला 3, यवतमाळ 3, बुलढाणा 3, नागपूर 381, वर्धा 15, चंद्रपूर 15, भंडारा 5 व गडचिरोली 5 या निवडणुकीसाठी 5 ते 11 सप्टेबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 12 सप्टेबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 15 सप्टेबर हा अर्ज मागे घेण्याचा अखरेचा दिवस आहे. त्याचदिवशी चिन्हांचे वाटप केले जाणारा आहे. 26 सप्टेबर रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून 27 सप्टेबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.