|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिरवळमध्ये वाईनशॉप चालकावर गोळीबार

शिरवळमध्ये वाईनशॉप चालकावर गोळीबार 

प्रतिनिधी/ खंडाळा

शिरवळ (ता. खंडाळा) येथील वाईनशॉप चालकावर शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताकडून गोळी झाडली. मात्र, नेम चुकल्याने वॉईनशॉप चालक बचावला असून या घटनेमुळे शिरवळसह परिसरात खळबळ उडाली आहे.

  याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरवळ येथील पळशी रोडवर एक वाईनशॉप आहे. वाईनशॉप चालक आकाश कबुले व कामगार यांनी शुक्रवारी दहा वाजता एक शटर बंद केले. तद्नंतर दुसरे शटर खाली घेवून शिल्लक मालाची पडताळणी, हिशोब पूर्ण करुन बाहेर आले. कामगार कुलूप लावत असताना पळशी बाजूकडून दुचाकी आली व मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती तेथे आल्या, त्यातील पाठीमागे बसलेल्या अज्ञात व्यक्तीने आकाश कबुलेच्या दिशेने गोळी झाडली.  मात्र, नेम चुकल्याने व गोळीच्या आवाजाने आकाश कबुले व कामगार सावध झाले. यावेळी गोळीबार करणारे दुचाकीवरून शिरवळ बाजूकडे पळून गेले आहेत.

   घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अविनाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, सागर अरगडे यांनी धाव घेतली. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱयांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून पुंगळी हस्तगत करण्यात आली आहे.