|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » दलितांच्या फक्त दोन पिढय़ांनाच आरक्षण मिळावे : भाजप खासदार

दलितांच्या फक्त दोन पिढय़ांनाच आरक्षण मिळावे : भाजप खासदार 

ऑनलाईन टीम  / मुंबई :

दलितांच्या फक्त दोन पिढ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. त्यानंतर त्यांना आरक्षण देऊ नये, असे वक्तव्य भाजपाचे  ज्येष्ठ नेते आणि खासदार सी पी ठाकूर यांनी केले आहे.

सवर्णांची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे. जर केंद्र सरकारने त्यांच्यासाठी तात्काळ कोणते पाऊल उचलले नाही तर देशात नवीन समस्या उभी राहू शकते, असे ते म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सी पी ठाकूर हे मंत्री होते. दलित आयएएस अधिकाऱयांच्या मुलांना नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाचा लाभ दिला जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले. यापूर्वीही ठाकूर यांनी दलित आरक्षणाला विरोध केला आहे. यापूर्वी त्यांनी आरक्षणच संपुष्टात आणले पाहिजे, असे वक्तव्य केले होते.