|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा विजयी

मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा विजयी 

तुरा :

 मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) उमेदवार कोनराड संगमा यांनी सोमवारी विधानसभा पोटनिवडणुकीत दक्षिण तुरा मतदारसंघात विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार चार्लोट मोमिन यांना सुमारे 8 हजार मतांनी पराभूत केले. तर काँग्रेसमधून बाहेर पडत एनपीपीत सामील झालेले मार्टिन दंग्गो हे रानीकोर मतदारसंघात पराभूत झाले. युनायटेड डेमोक्रेटिक पार्टीचे (युडीपी) उमेदवार पिअस मार्विन तेथे निवडून आले. दक्षिण तुरा मतदारसंघ अगाथा यांनी बंधू कोनराड यांच्यासाठी रिक्त केला होता.

मोदींनी केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोनराड यांचे अभिनंदन केले आहे. मेघालयाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याच्या प्रयत्नांसाठी कोनराड यांना शुभेच्छा, असे मोदींनी ट्विटद्वारे म्हटले. पोटनिवडणुकीनंतर विधानसभेत एनपीपीचे 20 आणि युडीपीचे 8 सदस्य झाले आहेत. कोनराड यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत पीडीएफचे 4, भाजपचे 2, एचएसपीडीपीचे 2, एनसीपीचा एक आमदार सामील आहे.

Related posts: