|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेत पाक विदेश मंत्र्यांना भेटू शकतात सुषमा स्वराज

अमेरिकेत पाक विदेश मंत्र्यांना भेटू शकतात सुषमा स्वराज 

इस्लामाबाद

: अमेरिका येथे सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक अधिवेशनाच्या व्यतिरिक्त विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे नवे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांची भेट होण्याची शक्यता आहे. इम्रान खान 18 ऑगस्ट रोजी पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान ही पहिली मंत्रिस्तरीय द्विपक्षीय चर्चा ठरू शकते. विदेश मंत्रालयाने मात्र स्वराज आणि कुरैशी यांच्या भेटीची अद्याप घोषणा केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुलैमध्ये इम्रान यांच्याशी फोनवरून संवाद साधत सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले होते. संयुक्त राष्ट्र महासभेचे 73 वे अधिवेशन न्यूयॉर्कमध्ये 18 सप्टेंबरपासून सुरू होईल. संयुक्त राष्ट्राकडून वक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यानुसार स्वराज 29 सप्टेंबर रोजी महासभेला संबोधित करणार आहेत. तर पाकिस्तानने अद्याप महासभेत प्रतिनिधित्व कोण करणार याचा निर्णय घेतलेला नाही. शासकीय खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांतर्गत इम्रान खान यंदाच्या महासभेत भाग घेणार नसल्याची चर्चा आहे.