|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » डिझेल दराचा विक्रमी उच्चांक

डिझेल दराचा विक्रमी उच्चांक 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याने इंधन दरात वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सोमवारी सलग दुसऱया दिवशी डिझेलचे दर वाढले. पेट्रोलच्या किंमतीतही वाढ होताना दिसत आहे. डिझेलच्या दरात 14 पैसे प्रतिलिटर तर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 13 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलची किंमत 85.33 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 73.74 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. डिझेलचा हा विक्रमी दर आहे. 16 ऑगस्टपासून सातत्याने सुरू असलेल्या दरवाढीमुळे इंधन दराने हा नवा उच्चांक गाठला आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये डिझेलच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहोचल्या आहेत. सोमवारी दिल्लीत एक लिटर डिझेलचे दर 69.46 रुपये झाला आहे. तर कोलकातात डिझेल 72.31 आणि चेन्नईत 73.38 रुपये प्रतिलिटर झाला आहे. दिल्लीत पेट्रोल दरात प्रतिलिटर 13 पैशांची वाढ झाली. दिल्लीत सोमवारी पेट्रोलचा दर 77.91 रुपये प्रतिलिटर होता. तर कोलकातामध्ये 80.84, मुंबईत 85.33 आणि चेन्नईत 80.94 रुपये प्रतिलिटर असा दर आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. रुपयाच्या दरात होत असलेली घसरण आणि मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे इंधनाच्या किंमती वाढत आहेत. मागील आठवडय़ात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली. मागील आठवडय़ात कच्च्या तेलाच्या दरात 5 टक्क्मयांची वाढ झाली होती. कच्च्या तेलाशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरणही इंधनाच्या दरवाढीस कारणीभूत आहे. सध्या हा दर 70 रुपयांच्यावर आहे.

केंद्र सरकार सध्या पेट्रोलवर प्रतिलिटर 19.48 रुपये तर डिझेलवर 15.33 रुपये प्रतिलिटर अबकारी कर लावते तर राज्यांकडे व्हॅट लावण्यात येतो. सर्वात कमी व्हॅट अंदमान-निकोबारमध्ये (6 टक्के) तर सर्वाधिक व्हॅट मुंबईत (पेट्रोलवर 39.14 टक्के) आहे. देशातील सर्व महानगरांमध्ये दिल्लीत इंधनाचे भाव सर्वात कमी आहेत. येथे व्हॅट किंवा विक्रीकराची किंमत कमी असल्याने इंधनाचे दरही तुलनेने कमी आहेत. यापूर्वी दिल्लीत डिझेलचा दर 29 मे रोजी 69.31 रुपये प्रतिलिटर इतका वाढला होता.

पेट्रोल दर नव्वदी गाठणार ?

गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा इंधन दरात वाढ झाली आहे. येणाऱया काळात 90 रुपयांपर्यंत पेट्रोलचे दर पोहोचू शकतात अशी शक्मयता वर्तविण्यात येत आहे. देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात सर्वाधिक घसरण झाल्यानंतर 16 ऑगस्टपासूनच डिझेल-पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मागील दहा दिवसात मुंबईत डिझेलच्या किमतीत 49 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल प्रतिलिटर 57 पैशांनी महागले आहे.

 

महानगरांमधील इंधन दर…

शहर               पेट्रोल दर                       डिझेल दर

मुंबई              85.33 रु.           73.74 रु.

दिल्ली                        77.91 रु.                       69.46 रु.

कोलकाता        80.84 रु.                       72.31 रु.

चेन्नई              80.94 रु.                       73.38 रु.