|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’त मेजर गोगोई दोषी

‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’त मेजर गोगोई दोषी 

कार्यस्थान सोडल्याचा आरोप : लष्कराकडून कारवाईचे आदेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सेनादलातील मेजर लितुल गोगोई यांना कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. सेनादलाच्या स्थानिकांशी संपर्क आणि दोस्ती या अभियानामध्ये मेजर गोगोई त्यांच्या निर्धारित कार्यस्थान सोडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये ते दोषी ठरले आहेत. त्यांच्यावर कारवाईचे आदेश सेनादलाने दिले आहेत. श्रीनगरमध्ये ते एका हॉटेलमध्ये स्थानिक महिलेसह दिसून आले  होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

काश्मीरमध्ये बंदोबस्तादरम्यान एका व्यक्तीला ‘मानवी ढाल’ केल्याचे चित्रण प्रसिद्ध झाल्यानंतर मेजर गोगोई एकदम प्रकाशझोतात आले होते. तथापि तसे केले नसते तर जमाव अधिक हिंसक झाला असता, असा त्यांनी दावा केला होता. त्यानंतरही ते श्रीनगरमध्ये एका स्थानिक महिलेसमवेत आढळल्याने पुन्हा एकदा ते चर्चेत आले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधकात्मक तसेच शिस्तभंगाची कारवाई केली जावी यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यादरम्यान सेनादलाच्यावतीने स्थानिक जनतेशी संपर्क आणि मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्यासाठी विशेष अभियान चालवले जात होते. मात्र कार्यस्थळ सोडून ते अन्यत्र आढळल्याने त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

23 मे 2018 रोजी घडलेल्या या घटनेवेळी ते 18 वर्षीय महिलेसह एका हॉटेलमध्ये आले होते. त्यानंतर या घटनेची कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचवेळी सेनाप्रमुख बिपिन रावत यांनी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे जाहीरही केले होते.