|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दरोडा प्रकरणातील संशयिताला पोलीस कोठडी

दरोडा प्रकरणातील संशयिताला पोलीस कोठडी 

प्रतिनिधी/ बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिंडाल्कोजवळ ट्रक अडवून चाकुचा धाक दाखवून चालकाची लुट करण्यात आली होती. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह तिघा जणांना पोलिसांनी काही तासातच अटक केली होती. या प्रकरणातील एका संशयिताला पोलीस कोठडीत घेण्यात आले.

महम्मदसमीद नियामतुल्ला रजवी (वय 19, रा. सुभाषनगर) असे त्याचे नाव आहे. माळमारुती पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन महम्मदसमीदला पोलीस कोठडीत घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस स्थानकात नेवून त्याची चौकशी करण्यात आली.

गेल्या रविवारी 19 ऑगस्ट रोजी रात्री मुंबईहून चेन्नईकडे जाणारी टीएन 25 बीएफ 5441 क्रमांकाची ट्रक अडवून हिंडाल्कोजवळ ट्रक चालकाजवळील रोकड पळविण्यात आली होती. चाकुचा धाक दाखवून दुचाकीवरुन आलेल्या तिघा जणांनी हे कृत्य केले होते. घटनेनंतर काही तासातच दोन अल्पवयीन मुलांसह तिघा जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी महम्मदसमीदला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.