|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सुनिता राणे, वसंत काटे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

सुनिता राणे, वसंत काटे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 

प्रतिनिधी /रत्नागिरी

सन 2017-18 च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील प्रत्येकी दोन शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक विभागातून चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी-बोलाडवाडी शाळेच्या शिक्षिका सुनिता गोविंद राणे तर माध्यमिक विभागातून पावस येथील वसंत बाबुराव काटे यांची निवड झाली आहे.

2017-18 च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीसाठी शासनाकडून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावरील 108 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 38 प्राथमिक, 39 माध्यमिक, 18 आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, 8 सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, 2 विशेष शिक्षक, 1 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक, 1 गाईड शिक्षक व 1 स्काऊट शिक्षक यांचा समावेश आहे. राज्य आदर्श शिक्षक या पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांमध्ये सिंधुदुर्ग जिह्यातील शामसुंदर मधुकर सावंत पोखरण नं 1 तालुका कुडाळ व संतोष बाळकृष्ण वालावलकर जामसंडे तालुका देवगड या दोन शिक्षकांचाही समावेश आहे. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना 5 सप्टेंबर 2018 रोजी एका विशेष समारंभात मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल शिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे.