|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » शरद कळसकरचा ताबा घेण्यासाठी केलेला सीबीआयच अर्ज कोर्टाने फेटाळला

शरद कळसकरचा ताबा घेण्यासाठी केलेला सीबीआयच अर्ज कोर्टाने फेटाळला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी चौकशीसाठी शरद कळसकरचा ताबा मिळावा यासाठी सीबीआयने सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

सीबीआयचा अर्ज कायदेशीरदृष्टय़ा योग्य नाही असं नमूद करत न्यायालायने हा अर्ज फेटाळला आहे. तसेच सीबीआयच्या कामकाजावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकरची या प्रकरणातील आणखी एक आरोपी सचिन अंदुरे यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याने त्याचा ताबा देण्याची मागणी सीबीआयने केली होती. सचिन अंदुरेची पोलीस कोठडी उद्या म्हणजे 30 ऑगस्टला संपत असून त्याला उद्या न्यायालयीन कोठडी मिळाल्यास कळसकर आणि अंदुरे यांची समोरासमोर चौकशी करता येणार नाही असा युक्तीवाद सीबीआयने न्यायालयासमोर केला. एखादा आरोपी एखाद्या यंत्रणेच्या पोलीस कोठडीत असताना त्याला दुसऱया यंत्रणेच्या पोलीस कोठडीत देण्यात यावा याला कायदेशीर आधार आहे का असा सवाल न्यायालयाने सीबीआयला केला.

 

Related posts: