|Saturday, March 23, 2019
You are here: Home » क्रिडा » शरापोव्हाची आगेकूच, फेडरर, ज्योकोव्हिकचा संघर्ष

शरापोव्हाची आगेकूच, फेडरर, ज्योकोव्हिकचा संघर्ष 

शरापोव्हाची आगेकूच, फेडरर, ज्योकोव्हिकचा संघर्ष

वृत्तसंस्था/ पॅरिस

अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीत मारिया शरापोव्हा, अँजेलिक्यू केर्बर, वोझ्नियाका, किर्गिओस तर पुरुष एकेरीत फेडरर, ज्योकोव्हिक, झेरेव्ह, राफेल नदाल यांनी विजय संपादन करत पुढील फेरी गाठली. भारताच्या युकी भांबरीला मात्र पहिला अडथळाही पार करता आला नाही. प्रेंचमन पिएरे हय़ुजेसने त्याला 3-6, 6-7 (3-7), 5-7 अशा फरकाने पराभूत केले. सर्व खेळाडूंना उष्णतेचा येथे प्रचंड त्रास झाला. रोमानियाचा कोपिल दुखापतीमुळे निवृत्त झाल्याने मॅरिन सिलिकला तर डेव्हिड फेरर निवृत्त झाल्याने नदालला पुढे चाल मिळाली.

स्पर्धेच्या दुसऱया दिवशी, बुधवारी पुरुष एकेरीत फेडरर व ज्योकोव्हिक यांना चांगलेच झगडावे लागले, ते आश्चर्याचे ठरले. फेडररने जपानच्या योशिहितो निशिओकाला 6-2, 6-2, 6-4 असे पराभूत केले. यात गुणांचा अधिक फरक असला तरी निशिओकाने प्रदीर्घ रॅलीजवर भर दिल्याने फेडररचीही बरीच दमछाक झाली. आता पुढील लढतीत बिगरमानांकित प्रेंचमन बेनोईट पैरेचा त्याच्याविरुद्ध कस लागेल.

अन्य लढतीत नोव्हॅक ज्योकोव्हिकने हंगेरीच्या मॉर्टन फुक्सोव्हिक्सला 6-3, 3-6, 6-4, 6-0 असे पराभूत केले. प्रचंड उष्णतेमुळे तिसऱया व चौथ्या सेटदरम्यान दोन्ही खेळाडूंनी दहा मिनिटांची विश्रांती घेतली. या ब्रेकदरम्यान दोन्ही खेळाडूंना आपल्या प्रशिक्षकांशी बोलण्याची मुभा नव्हती. आणखी एका सामन्यात जर्मनीच्या चौथ्या मानांकित झेरेव्हने कॅनडाच्या पीटर पोलन्स्कीला 6-2, 6-1, 6-2 असे पराभूत केले. रोमानियाच्या मॅरिअस कोपिलला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यानंतर मॅरिन सिलिकला पुढे चाल मिळाली. सिलिक यावेळी 7-5, 6-1, 1-1 अशा फरकाने आघाडीवर होता. विद्यमान जेता नदालला देखील राष्ट्रीय सहकारी डेव्हिड फेररला पोटरीच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यानंतर पुढे चाल मिळाली. नदालने पहिला सेट 6-3 असा जिंकला. पण, दुसऱया सेटमध्ये तो 3-4 फरकाने पिछाडीवर होता.

महिला एकेरीत रशियाच्या मारिया शरापोव्हाने स्वित्झर्लंडच्या पॅटी स्नायडरला 6-2, 7-6 (6) असे पराभूत केले. 2006 मध्ये अमेरिकन ग्रँडस्लॅम जिंकणाऱया शरापोव्हाला पहिल्या सेटमध्ये बरेच झगडावे लागले. पण, स्नायडर याचा लाभ घेऊ न शकल्याने शरापोव्हा सुदैवी ठरली. केर्बरने अन्य लढतीत रशियाच्या मार्गारिटा गॅस्पर्यनला 7-6 (5), 6-3 असे पराभूत केले. माजी अव्वलमानांकित कॅरोलिन वोझ्नियाकीने दुखापतीशी झगडत असलेल्या ऑस्ट्रेलियन समंथा स्टोसूरला 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये नमवले.

Related posts: