|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बिडीजवळ ट्रक-कार अपघातात युवक ठार

बिडीजवळ ट्रक-कार अपघातात युवक ठार 

दोघे जखमी, मृत-जखमी गोकाक येथील

वार्ताहर/ नंदगड

खानापूर-तालगुप्पा राज्यमार्गावरील बिडी गावाजवळील वजन काटय़ाजवळ ट्रक व कारची समोरासमोर झालेल्या टकरीत कारमधील युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात विनायक दशरथ मराठे (वय 22) हा युवक ठार झाला. तर अन्य दोघांवर बेळगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

बिडीहून ट्रक खानापूरकडे येत होता. विरुद्ध दिशेने जाणाऱया कारची ट्रकला धडक बसली. यात कारचा समोरचा भाग पूर्णपणे चेपला असून त्यामध्ये असलेल्या तिघांना जबर दुखापत झाली. अपघातातील जखमींना बिडी येथील होली क्रॉस शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लैसा यांनी आपल्या वाहनातून नंदगड येथील शासकीय दवाखान्यापर्यंत नेले. जखमींना जबर मार बसल्याने व अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून बेळगावला हलविण्यात आले. परंतु, विनायक मराठे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. जखमींमध्ये मृत विनायकचे नातलग असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नंदगड येथे एका क्यक्तीला भेटून ते बिडीकडे चालले होते. या अपघाताची नोंद नंदगड पोलिसात झाली आहे. मृत व जखमी बुदिहाळ (ता. गोकाक) येथील आहेत.