|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » म्हाडाच्या घोटाळेबाज अभियंत्यांचे काय?

म्हाडाच्या घोटाळेबाज अभियंत्यांचे काय? 

चौकशी उपमुख्य अभियंत्याच्या हातात;

37 कंत्राटदार काळ्या यादीत प्रकरण

मुंबई / प्रतिनिधी

37 घोटाळेबाज कंत्रादारांना म्हाडाने कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकत या  कंत्राटदारांवर मेहेरनजर दाखविणाऱया झोपु सुधार मंडळातील अभियंत्याची चौकशी म्हाडाच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकारी विभागाने पूर्ण केली आहे. या अहवालात 75 अधिकाऱयांना दोषी ठरवले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दक्षता विभागाने दिली होते. हा चौकशी अहवाल म्हाडाच्या उपाध्यक्षांकडे सादर केल्यानंतर आता प्राधिकरणने म्हाडा खातेअंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. आता या अभियंत्याची चौकशी उपमुख्य अभियंत्याच्या हातात देण्यात आली आहे.

म्हाडाच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकारी विभागाने त्यांच्या अहवालात 75 अधिकाऱयांवर ठपका ठेवल्यानंतर हा अहवाल म्हाडाच्या उपाध्यक्षांकडे सादर केला. आता प्राधिकरणाने या दोषी अभियंत्यांची म्हाडा खातेअंतर्गत चौकशी करण्याचे ठरवले आहे. म्हाडातील उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी यांच्यावर या चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे. सदर चौकशीची प्रक्रिया सुरु झाल्याचे सांगण्यात येत असून या चौकशीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची चर्चा मदत आहे.

आरटीआय कार्यकर्त्यांचा अड्डा म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळात (स्लम बोर्ड) खासदार आणि आमदार निधी स्थानिक विकास कामाअंतर्गत बनावट चाचणी प्रमाणपत्र लावून 37 कंत्राटदारांनी भ्ा्रष्टाचार केला होता. या 37 घोटाळेबाज कंत्रादारांना म्हाडाने कायमस्वरुपी काळ्यायादीत टाकत या कंत्राटदारांवर मेहेरनजर दाखविणाऱया झोपु सुधार मंडळातील 56 अभियंत्यांवर खातेअंतर्गत चौकशी म्हाडाने सुरू केली होती. मात्र, सरकारने या प्रकरणाची चौकशी म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी विभागाकडे सोपवली होती. त्यानुसार दक्षता विभागाने जानेवारीतच ही चौकशी सुरू केली होती. म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी विभागाने साडेतीन महिन्यात चौकशी पूर्ण केली. यात अंदाजे 127 अधिकारी कर्मचाऱयांची चौकशी करण्यात आली असून यामध्ये 75 अधिकाऱयांना दोषी ठरवण्यात आले. 75 अधिकाऱयांपैकी 14 अधिकारी-कर्मचारी निवफत्त झालेले आहेत. दोषी ठरवण्यात आलेल्यांची नेमकी जबाबदारी काय होती, ही जबाबदारी त्यांनी कशा पध्दतीने पार पाडली, यात त्यांच्या चुका किती गंभीर आहेत, त्यानुसार त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी विभागाने एप्रिल महिन्याच्या शेवटी हा चौकशी अहवाल म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैस्कर यांच्याकडे सादर केला. आता या अहवालानंतर पुन:प्राधिकरणाने म्हाडा खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिकाऱयांवर उगारला होता कारवाईचा बडगा

2012 मध्ये खासदार आणि आमदार निधी स्थानिक विकास कामात कंत्राटदारांनी बनावट चाचणी प्रमाणपत्र लावून कोटय़वधी रुपयांची बिले पास करून घेतल्याचा ठपका ठेवत या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे लोकलेखा समितीने म्हाडाला निर्देश दिले होते. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने 20 सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि नोंदणीकृत कंत्राटदार तसेच 17 मजूर सहकारी संस्था यांना 7 ऑगस्ट रोजी कायमस्वरुपी काळ्यायादीत टाकत संबंधीत अधिकाऱयांवरही कारवाईचा बडगा उगारलेला होता.

Related posts: