|Saturday, March 23, 2019
You are here: Home » क्रिडा » 400 मी. रिलेत भारतीय महिला संघाचे सुवर्णयश, पुरुष संघाला रौप्य

400 मी. रिलेत भारतीय महिला संघाचे सुवर्णयश, पुरुष संघाला रौप्य 

महिला 4ƒ400 मीटर रिले संघात समावेश असलेल्या हिमा दास, एम. पुवम्मा, सरिताबेन गायकवाड व विस्मया केरोथ यांनी आपला दबदबा कायम राखताना भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताच्या या चौकडीने 3 मिनिटे 28.72 सेकंदासह यश संपादन केले. विशेष म्हणजे, महिला रिलेत 2002  आशियाई स्पर्धेपासून सुवर्णपदकावर मक्तेदारी राखली आहे. त्यांचे हे सलग पाचवे सुवर्ण आहे. बहरीनने 3 मिनिटे 30.61 वेळेसह रौप्य तर व्हिएतनामने 3 मिनिटे 33.23 सेकंदासह कांस्यपदक पटकावले. महिला रिले संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुरुषही सोनेरी कामगिरी करतील, असे वाटत होते. पण, भारतीय पुरुष संघाला 4ƒ400 रिलेत मात्र  रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. भारताने 4ƒ400 चे अंतर 3 मिनिटे 01.85 सेकंदात पूर्ण केले. कतारने 3 मिनिटे 56 सेकंद वेळेसह सुवर्ण तर जपानने 3 मिनिटे 01.94 सेकंदासह कांस्यपदकाला गवसणी घातली. भारतीय पुरुष रिले संघात एमी कुन्ही, धरुण अय्यास्वामी, राजीव अरोकिया व मोहम्मद अनास यांचा समावेश होता. यापूर्वी, 2014 आशियाई स्पर्धेत पुरुष संघ चौथ्या स्थानावर राहिला होता.

 

Related posts: