|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » हत्ये दिवशी सचिन अंदुरे कामावर गैरहजर

हत्ये दिवशी सचिन अंदुरे कामावर गैरहजर 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सचिन अंदुरेच्या विरोधतील महत्त्वाचा पुरावा सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. डॉ. दाभोलकर हत्येच्या आदल्या दिवशी (दि. 19 ऑगस्ट 2013) सचिनची साप्ताहिक सुटी होती, तर हत्येच्या (दि. 20 ऑगस्ट 2013) रोजी तो कामाच्या ठिकाणी गैरहजर असल्याची खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे.

याविषयी सूत्रांनी सांगितले की, अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने औरंगाबादेतील कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता सचिन अंदुरे याला दि. 16 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यापुर्वी, मुंबई एटीएसने सचिनला दि. 14 रोजी चौकशीसाठी नेले होते. त्याची तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर एटीएसने दि. 16 रोजी सायंकाळी त्याला औरंगाबादेतील औरंगपुरा भागातील सासुरवाडीत आणून सोडले. सचिन हा त्याच्या भावासह सासुरवाडीत जेवण करीत असतानाच सीबीआयच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि मुंबईला नेले होते.

चौकशीनंतर त्याला डॉ. दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी अटक केली. सध्या तो सीबीआयच्या कोठडीत आहे. सीबीआयचे पथक तेव्हापासून औरंगाबादेत तळ ठोकून आहे. सचिन निराला बाजार येथील एका कापड दुकानात नऊ ते दहा वर्षांपासून नोकरी करतो. त्याला कामावर ठेवल्यापासून दुकानमालकाने हजेरी रजिस्टर ठेवले आहे. त्याच्यासह कामावरील अन्य कर्मचारी नियमित हजेरी रजिस्टरवर सह्या करीत असतात.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी दि. 19 ऑगस्ट 2013 रोजी सचिनची साप्ताहिक सुटी होती. यामुळे तो त्यादिवशी कामावर उपस्थित नव्हता. दि. 20 रोजी दाभोलकर यांची हत्या झाली त्यादिवशी तो गैरहजर होता. त्यामुळे दि. 19 व 20 रोजीच्या हजेरी रजिस्टरवर त्याची स्वाक्षरीच नाही. हे रजिस्टर सीबीआयने जप्त केल्याची माहिती वरि÷ सूत्रांनी दिली.

 

 

 

 

Related posts: