|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तामिळनाडूमध्ये बस दुर्घटनेत 7 जण ठार 30 जखमी

तामिळनाडूमध्ये बस दुर्घटनेत 7 जण ठार 30 जखमी 

सालेम :

तामिळनाडूमध्ये शनिवरी सालेम जिल्हय़ाच्या शेजारी झालेल्या एका बस दुर्घटनेत 7 जण ठार आणि 30 जखमी झाले आहेत. या अपघातात दोन महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. हि घटना कोयबतूर या ठिकाणापासून 150 किलोमीटर लांब रात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाली आहे. या बसने रस्त्याच्याकडेला उभी असणाऱया एका मीनी बसला जोराची धडक दिल्याने बस उलटल्याने काही जणांचा जागेवर मृत्यु झाला. घटनेचे स्वरुप लक्षात घेऊन घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. यावेळी सालेमच्या जिल्हाधिकारी रोहीणी यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्य गतीमान करण्याच्या सुचना केल्या.