|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » महात्मा गांधींची हत्या करणारे आज सत्तेत त्यांना तुरूंगात टाकणार का ? : स्वरा भास्कर

महात्मा गांधींची हत्या करणारे आज सत्तेत त्यांना तुरूंगात टाकणार का ? : स्वरा भास्कर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱया अभिनेत्री स्वरा भास्करच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींची हत्या करणारे आज सत्तेत बसले आहेत, त्यांना तुरुंगात टाकणार का, असे वक्तव्य स्वरा भास्करने केले.

दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर स्वरा भास्करने आपली भूमिका मांडली. देशभरात कथित नक्षलसंबंधांवरुन जे अटकसत्र सुरु आहे, त्यासोबत स्वरा भास्करचं हे वक्तव्य जोडले जात आहे.“महात्मा गांधींची हत्या करण्यात आली तेव्हा सगळा देश शोकसागरात बुडाला होता. तरीही काही लोक असे होते ज्यांनी आनंद व्यक्त केला, उत्सव साजरा केला. ते लोक आज सत्तेत आहेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात टाकणार का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे,’’ असे स्वरा भास्कर म्हणाली.