|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सहकार क्षेत्रात प्रस्तापितांविरुद्ध उठाव

सहकार क्षेत्रात प्रस्तापितांविरुद्ध उठाव 

प्रतिनिधी/ पणजी, फोंडा, म्हापसा

राज्याच्या सहकार क्षेत्रातील विविध संस्थांमधील गैरव्यवहार हा सतत चर्चेचा विषय आहे. त्यातच सध्या गोवा डेअरी, गोवा राज्य सहकारी बँक, तसेच म्हापसा अर्बन बँक या तीन सहकारी संस्थांचे भागधारक, ग्राहक, कर्मचारी यांनी प्रस्तापितांच्या विरोधात जोरदार उठाव केला आहे. गोवा डेअरीतील घोटाळय़ांची दखल घेतल सहकार निबंधकांनी काही संचालकांना अपात्र केले आहे, तर व्यवस्थापकीय संचालक नवसू सावंत यांना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. दुसऱया बाजूने गोवा राज्य सहकारी बँकेच्या रविवारच्या आमसभेत बँकेच्या नफा-तोटय़ावरून बँकेचे प्रशासक, ऑडिटर व भागधारकांमध्ये मोठा संघर्ष झाला. तिसरीकडे म्हापसा अर्बनबाबतीत संचालक मंडळाने राजीनामा द्यावा, ही भागधारकांची मागणी उचलून धरून बँकेच्या तब्बल 24 शाखांमधील कर्मचाऱयांनीही तीच मागणी केली आहे. एकंदरीत राज्याच्या सहकार क्षेत्रातील या घडामोडी म्हणजे भागधारकांनी सुरू केलेली ही स्वच्छता मोहीमच आहे.

Related posts: